अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निवडणुक कार्यक्रम घोषित केला आहे.
यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीमधील मागास प्रवर्गासाठी राखीव जागांवर निवडणूक लढविण्यात इच्छुक असलेल्या व ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही अशा सर्व मागासवर्गीय उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करावयाच्या प्रक्रियेत बदल करण्यात आल्याची नोंद घ्यावी,
असे जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, अहमदनगर येथील उपायुक्त तथा सदस्य अ.मु. शेख यांनी कळविले आहे. दि. 1 ऑगस्ट 2020 पासुन जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करावयाच्या प्रक्रियेत बदल करण्यात आलेला आहे.
जात वैधता प्रमाणपत्रासाठी आपले अर्ज www.bartievalidity.maharashtra.gov.in या वेबपोर्टलवर परिपूर्ण भरल्यानंतर आवश्यक दस्तऐवज अपलोड करून ऑनलाईन सबमिट करावेत.
त्यानंतरत्याची प्रिंट घेऊन पूर्वीप्रमाणेच विहीत कार्यपध्दतीने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पडताळणी समिती कार्यालयाकडे प्रत्यक्ष सादर करावेत.
जुन्या पध्दतीने हस्तलिखित स्वरुपातील अर्ज समिती, कार्यालयात स्विकारले जाणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी. असे आवाहन पडताळणी समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये