अगदी स्वस्तात केरळची टूर तेही विमानाने; कोणाची आणि कशी आहे ऑफर ? वाचा…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- जर आपल्याला कामापासून ब्रेक घ्यायचा असेल तर बाहेर फिरून येणे हा एक उत्तम पर्याय आहे. हे मनाला विश्रांती आणि ताजेतवाने करते. फिरायला जायचे असेल तर, आयआरसीटीसी सहसा नवीन टूर पॅकेजेस आणते, जे स्वस्त देखील असतात.

नव्या टूर पॅकेजमध्ये आयआरसीटीसीने अत्यंत किफायतशीर दरात केरळला भेट देण्याची संधी आणली आहे. यात तुम्हाला विमानाने नेले जाईल.

फेब्रुवारीत केरळला जाऊन या –

इंडियन रेलवे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) फेब्रुवारीमध्ये दिल्ली ते केरळ पर्यंत खास विमान प्रवासी पॅकेज देईल. ही ‘डिस्कवर केरल विद आईआरसीटीसी’ नावाची डिलक्स क्लास ऑफर आहे. पाच दिवसांच्या पॅकेज टूरमध्ये टी म्यूजियम एंड प्लांटेशन, मेट्टुपेटी डॅम, इको पॉईंट, डच पॅलेस आणि मरीन ड्राईव्हवरील बोट राईड अशा ठिकाणांच्या भेटींचा समावेश आहे.

दौरा कोठे व केव्हा सुरू होईल –

हा दौरा 20 फेब्रुवारीला नवी दिल्ली ते कोची येथे हवाई मार्गाने सुरू होईल आणि 25 फेब्रुवारीला राष्ट्रीय राजधानीत परत येईल. एका व्यक्तीसाठी खर्च 37,550 रुपये आहे. त्याचवेळी दोन लोकांसाठी दरडोई खर्च 27,800 रुपये होईल, तर तीन लोकांसाठी दरडोई खर्च 26,260 रुपये असेल.

मुलांसाठी किती खर्च येतो –

ज्यांना मुलं आहेत त्यांच्यासाठी प्रति बेड (5-11 वर्ष) प्रति मुलाचा खर्च 23,200 रुपये आहे आणि विना बेड (5-11 वर्ष) प्रति मुलाचा खर्च 20,680 रुपये आहे. त्याचप्रमाणे, 2-4 वर्षाच्या वयाच्या मुलाचा खर्च 12,360 रुपये आहे.

तुम्हाला यात काय काय मिळेल ? –

या पॅकेजमध्ये विस्तारा एअरलाइन्स (दिल्ली-कोचीन-दिल्ली) ची तिकिटे, हॉटेलमध्ये जेवण (पाच ब्रेकफास्ट, एक लंच आणि पाच डिनर यांचा समावेश आहे. प्रत्येक तिकिटात त्याचा समावेश असेल. तसेच एसी कारद्वारे दर्शनीय स्थळांना भेटी दिल्या असतील. सुसज्ज खोल्यांमध्ये राहण्याची व्यवस्था. यामध्ये कोचीनमधील एक रात्र, मुन्नारमधील दोन रात्री, थेक्कडीत एक रात्र समाविष्ट आहे.

इंश्योरेंस देखील मिळेल –

कुमारकोममध्ये एक रात्रीचे हाऊसबोट निवास देखील समाविष्ट आहे. प्रवासासाठी पाच दिवस पर्यटकांना दररोज एक बाटली मिनरल वॉटर देण्यात येईल. 60 वर्षाखालील प्रवाश्यांना प्रवास विमा देखील मिळेल. इच्छुक प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक 16, अजमेरी गेट साइड, नवी दिल्ली रेल्वे स्टेशन येथे असलेल्या आयआरसीटीसी टूरिस्ट फॅसिलिटी सेंटरला किंवा 9717641764 आणि 9717648888 वर कॉल करू शकतात.

बुकिंगसाठी आपण प्रबीर सोनोवाल 9717640773 वर किंवा रविंदर सिंग याना 8287930746 वर कॉल करू शकता. अधिक माहितीसाठी (https://www.irctctourism.com/pacakage_description?packageCode=NDA14) लिंक वर जाऊ शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment