छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे Railway संदर्भात खा. लंकेंची बैठक ! निंबळक, विळद येथील…

Published on -

छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर-पुणे या रेल्वेमार्गासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत खा. नीलेश लंके यांची अहिल्यानगर येथे महत्वपुर्ण बैठक पार पडली. खा. लंके यांनी यापूर्वी मागणी केलेल्या निंबळक व विळद येथील रेल्वे उड्डाणपुलास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिल्याची माहिती खा. लंके यांनी पत्रकारांना दिली.

दळवणवळण सुलभ होऊन जिल्ह्याच्या सर्वांगिण विकास व्हावा यासाठी खा. लंके यांनी छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर-पुणे असा रेल्वेमार्ग सुरू करण्याची मागणी खा. लंके यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली असून त्यासंदर्भात दिल्ली येथे त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. या पार्श्वभुमीवर रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत अहिल्यानगर येथे महत्वपुर्ण बैठक पार पडली. यावेळी संभाजीनगर ते पुणे रेल्वे मार्गाबरोबरच नगर पुणे इंटरसिटी सेवा, निंबळक, विळद येथील मंजुर उड्डाणपुलाच्या कामासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

खा. लंके यांनी सांगितले की, संभाजीनगर-अहिल्यानगर-पुणे या रेल्वे मार्गासंदर्भात आपण संसदेत मागणी केली होती. या मागणीचा आपण रेल्वे मंत्रालयाकडेही पाठपुरावा करत आहोत. आपण प्रस्तावित केलेल्या रेल्वे मार्गावर श्री.क्षेत्र देवगड, श्री. क्षेत्र शनिशिंगणापुर, रांजणगांव गणपती या प्रसिध्द तिर्थस्थळांबरोबरच वाळुंज, नगर, सुपा-पारनेर, रांजणगांव या औद्योगिक क्षेत्रांचा समावेश आहे. हा मार्ग झाल्यानंतर तिर्थक्षेत्रांना भेटी देणाऱ्या भाविकांबरोबरच औद्योगिक वसाहतीमध्ये तयार होणारी उत्पादने तसेच या उद्योगांना लागणारा कच्चा माल याच्या वाहतूकीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

संभाजीनगर-अहिल्यानगर मार्गाचे सर्वेक्षण
खा. लंके यांनी सांगितले की आपण केलेल्या मागणीनुसार तसेच रेल्वे मंत्रालयाकडे केलल्या पाठपुराव्यानंतर छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर या ८० किलोमीटर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण पुर्ण झाले असून या कामास लवकरच सुरूवात होणार असल्याचे ते म्हणाले.

इंटरसिटी सेवेच्या मागणीस प्रतिसाद
नगर ते पुणे या मार्गावर जिल्ह्यातील अनेक नागरीक दररोज प्रवास करतात. नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी वर्गाला पुण्यात पोहचण्यासाठी तसेच पुण्याहून नगरकडे पोहचण्यासाठी वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतो. या प्रवाशांच्या सोईसाठी नगर-पुणे ही इंटरसिटी रेल्वे सेवा ट्रायल ॲण्ड रन बेसिसवर सुरू करण्याची मागणी करण्यात आली असून या मागणीस सकारात्मक प्रतिसाद मिळत असून ही सेवा लवकरच सुरू होईल असा विश्वास खा. लंके यांनी व्यक्त केला.

विळद, निंबळक उड्डाणपुलांना मंजुरी
नगर तालुक्यातील निंबळक तसेच विळद येथील रेल्वे उड्डाणपुलासंदर्भात संसदेत आवाज उठविण्यात आला होता. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मंत्रालयाशी पाठपुरावा केल्यानंतर या दोन्ही उड्डाणपुलांना मंत्री वैष्णव यांनी मंजुरी दिली असून तसे पत्र खा. लंके यांना प्राप्त झाले आहे. या रेल्वे उड्डाण पुलांच्या कामांना लवकरात लवकर सुरूवात करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली.

अखेरपर्यंत पाठपुरावा
जिल्हयाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण संसदेमध्ये विविध प्रकल्पांची मागणी करत आहोत. छत्रपती संभाजीनगर, सुपा-पारनेर-रांजणगांव ही औद्योगीक क्षेत्रे झपाटयाने विकसित होत आहे. देशातील महत्वाची औद्योगीक क्षेत्र अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. या पार्श्वभुमीवर दळणवळणाच्या दृष्टीने रेल्वे मार्ग हे अत्यंत महत्वाचे असल्याने आपण त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. या मागणीची तड लागेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe