४० वर्षापासून चिक्कूची बाग ठरतोय शेतकऱ्याचा आधार, दरवर्षी कमी खर्चात मिळतंय लाखोंचं उत्पन्न

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- पारंपरिक शेतीला फाटा देत दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी आता कापूस, सोयाबीन पिकांकडे पाठ फिरवत, पडीक शेतीवर फळबाग लागवड करण्याकडे मोर्चा वळवला आहे.

कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा, या संकटातुन बाहेर पडण्यासाठी बीडचे शेतकरी आता शेतीमध्ये नवीन प्रयोग करताना दिसत आहेत.

तर यातूनच लाखोंचं उत्पन्न देखील घेत आहेत अशाच एका शेतकऱ्यांनं ,आजोबांनी ४० वर्षांपूर्वी लावलेली चिकूचे बाग जोपासली असून कुटुंबाचा आधार बनली आहे.

बीड तालुक्यातील नेकनूर येथील शेतकरी जयदीप काळे यांच्या आजोबांनी 1980 चिक्कूची बाग लावलीय. आज या बागेला जवळपास ४० वर्ष पूर्ण झाली असून जयदीप काळे यांच्या मेहनतीने वर्षाकाठी लाखों रुपये उत्पन्न या बागेतून मिळत आहे.

कमी खर्च अन अल्पशा मेहनतीवर आजपर्यंत त्यांना या बागेतून निव्वळ उत्पन्न जवळपास २५ लाख मिळालं आहे. यामुळं दरवर्षी पारंपरिक शेतीतून होणारं नुकसान फळबागेतून होत नाही.

शिवाय कमी पाणी अन कमी मेहनत असल्याने उत्पन्न काढण्यास अधिक सोप्पं झालंय. मराठवाड्यात शेतकरी आज अनेक अडचणींना सामोरे जातोय.

मात्र शेतकऱ्यांनी योग्य माहिती, योग्य नियोजन करून प्रगत शेतीची कास धरली तर नक्कीच त्याचा फायदा आर्थिक घडी बसवण्यास होतो.

त्यामुळं योग्य नियोजन करून फळबाग जोपासली तर ती कशी आधार बनते, हेच दुष्काळी बीड जिल्ह्यातील काळे यांनी दाखवून दिलं आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment