अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कोपरगाव शहरात एस . जी . शाळेच्या ग्राऊंडवर काल ८ . ३० च्या सुमारास शेख नावाच्या विद्यार्थ्यास ८ जणांनी जमाव जमवून पेपर न दाखवल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून चॉपरने डोक्यात मारुन जखमी केले.
इतरांनी लाथाबुक्क्याने मारहाण करुन जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली . जखमी साद या विद्यार्थ्याने कोपरगाव शहर पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी जय , सचिन , कृष्णा , ऋषिकेश , यश , ओम , गौरव , अभिषेक सर्व रा . कोपरगाव यांच्याविरुद्ध भादवि कलम ३२४ , ३२३ , ५०४ , ५०६ , १४३ , १४७ , १४८ , १४९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने एस . जी . शाळेच्या परिसरात व विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आह.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com