अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- फळबाग योजनेचे कुशल कामाच्या अनुदानासाठी तालुक्यातील शेतकरी गेल्या पाच महिन्यांपासून कृषी अधिकारी कार्यालयाच्या चकरा मारत होते.
अखेर जुलैमध्ये निधी मिळाला व तुमचे पैसे बॅंकेत पाठविल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. कृषी अधिकारी कार्यालयाने स्टेट बॅंकेच्या येथील शाखेत 17 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या अनुदानाचा चेक दिला.
दरम्यान बँकेचा भोंगळ कारभार तर पहा कृषी अधिकाऱ्यांनी दिलेला हा अनुदानाचा धनादेश चक्क बॅंकेकडूनच गहाळ झाला आहे. बँकेच्या या घोडचुकीमुळे शेतकऱ्यांना अनुदानाचे पैसे मिळाले नाहीत.
शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोर यांची भेट घेऊन अनुदानासाठी साकडे घातले. गहाळ झालेले धनादेश रद्द करून नवीन धनादेश काढून शेतकऱ्यांच्या बॅंकखात्यांत पैसे पाठविल्याचे कृषी अधिकारी भोर यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी फळबागेचे कामे करून सहा महिने झाले, तरी कृषी विभागाने शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत. त्यामुळे रोजगार हमी योजनेच्या कायद्याचे उल्लंघन झाले आहे.
याबाबत चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करावी व शेतकऱ्यांना तातडीने पैसे मिळावेत, अशी मागणी शेतकरी प्रियांका अभिजीत गर्जे यांनी केली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved