दिवाळीपर्यंत नागरिकांना गोड बातमी मिळेल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :-राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज टाटा औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कंट्रोल रूमची पाहणी केली. १२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील वीज पुरवठा ठप्प झाला तेव्हा टाटा पॉवरने नेमकं नियोजन कसे केले आणि टाटाची आयलँडिंग यंत्रणा कशी काम करतेय, याबद्दल ते टाटा पॉवरच्या अधिकारी वर्गाशी चर्चा केली.

त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले गेल्या १२ ऑक्टोबरला मुंबई अंधारात का गेली? त्याचा शोध घेण्यासाठी मी हा दौरा करत आहे. माझ्या खात्याची समिती सुद्धा याबाबत टेक्निकल गोष्टीचा शोध घेत आहे, यापुढे मुंबईकरांवर अशी वेळ येणार नाही.

येत्या 2030 पर्यंतचा माईल स्टोन ठेवला आहे की वीज पुरवठा आणखी कशाप्रकारे वाढू शकतो. मुंबईला २४ तास वीज सातत्याने खात्रीची कशी देता येईल, याचे प्रयत्न सुरु आहेत,” असेही ते यावेळी म्हणाले. “मी वीज गायब झाल्याने शंका व्यक्त केली होती. त्यावर तांत्रिक समिती अहवाल काल आला आहे.

तो मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाईल. तसेच मी जी तांत्रिक समिती नेमली होती, त्याचा अहवाल येणे बाकी आहे.” असेही नितीन राऊतांनी यावेळी सांगितले. तसेच “राज्यातील वाढीव वीजबिलासंदर्भात आम्ही सात वेळा रिपोर्ट पाठवला आहे. त्यासाठी अर्थखात्याला फाईल दिली आहे.

येत्या दिवाळीपर्यंत नागरिकांना लवकरच गोड बातमी मिळेल,” असे संकेत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. आम्हांला मातोश्रीवरुन फोन आला आहे. त्यामुळे वीज बिलासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ. यााबाबतची फाईल वित्त विभागाकडे गेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आजारी होते.

पण आता ते बरे झाले आहे. त्यामुळे याबाबत लवकरच निर्णय घेऊ,” असेही नितीन राऊत यांनी सांगितले. १०० युनिटपर्यत वीज फ्री देण्याबाबत मी ऊर्जामंत्री म्हणून सांगितलं आहे. मात्र त्यावर अर्थमंत्री म्हणून अजित पवार बोलतील. तसेच माझ्या समितीचा रिपोर्ट आल्यानंतरच मी त्यावर आणखी योग्य भाष्य करेन. यंदा दिवाळीत नागरिकांना नक्कीच सप्रेम भेट मिळेल,” अशी प्रतिक्रिया नितीन राऊत यांनी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment