अहमदनगर :- दुकानासमोर सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेले पत्रकार अन्सार सय्यद यांनाच गुंडांनी बेदम मारहाण करून जखमी केले.
ही घटना कोठला येथील राज चेंबर परिसरात शनिवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी अजिम हनिफ शेख व इतर ५-६ जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला.
आरोपी अजिम व इतरांनी त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. एकाने त्यांच्या डोक्यात गज मारून त्यांना जखमी केले.
सय्यद यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपास हेड कॉन्स्टेबल एस. पी. केरूळकर करत आहेत.
- केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोग स्थापनेला मंजुरी ; पगारात काय फरक पडेल ?
- 8th Pay Commission Breaking : एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ; 2026 पासून होणार लागू
- 8th Pay Commission : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्राची मंजुरी
- माणसाचे गीत गाणारे – डॉ. सुधीर तांबे
- लोकसर्जन – मा.आ.डॉ सुधीर तांबे.