अहमदनगर :- भाजप प्रणित मोदी सरकारच्या हुकुमशाही निर्णयांमुळे देशाची अर्थव्यवस्था अनागोंदीत सापडल्याचा पीपल्स हेल्पलाईन व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने हुतात्मा स्मारकात निषेध नोंदविण्यात आला.
तर अर्थव्यस्थेसाठी वारंवार धोक्याचा इशारा देणारे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना इंडियन लॉरिस्टर अगेन्स्ट गव्हर्नन्स इन्ट्रॉपी सन्मानची मानवंदना देण्यात आली.

यावेळी अॅड. कारभारी गवळी, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अशोक भोसले, किशोर मुळे, पोपट भोसले, नामदेव अडागळे, शिवाजी पालवे, संदिप पवार, शांता ठुबे, हिराबाई ग्यानप्पा, अंबिका नागुल, शारदा गायकवाड, मुजावर बेगम, जयश्री भुजबळ, शबाना शेख, अंबिका जाधव, लतिका पाडळे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मोदी सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे देशात आर्थिक मंदीचे सावट निर्माण झाले आहे. अनेक युवकांना नवीन नोकर्या तर मिळाल्या नाहीत, उलट असलेल्या नोकर्या घालवण्याची वेळ या मंदीमुळे आली आहे. सर्वसामान्य नागरिक महागाईने होरपळत आहे. देशातील आर्थिक तज्ञांच्या मदतीने हे संकट दूर करण्याची गरज आहे.
मागील पंचवार्षिकला घोषणा करण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजनेचा लाभ अद्यापि सर्वसामान्य घरकुल वंचितांना मिळाला नाही. गाईडेड लॅण्ड डेव्हलपमेंट तंत्र म्हणजेच हायब्रीड लॅण्ड पुलिंगद्वारे घरकुल वंचितांच्या जागेचा प्रश्न सुटणार आहे. मात्र सरकारकडे मुलभूत सोयी, सवलती व योजना अंमलबजावणी इच्छाशक्तीचा अभाव असल्याने ही योजना कार्यान्वीत होताना दिसत नाही.
जागेअभावी अडीच लाखाचे अनुदान धनदांडग्यांना वाटले जात असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. महात्मा गांधींच्या तत्व व विचारांनी काम करणार्या समविचारी व्यक्तींना एकत्र आणण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने इंडियन चेंबर्स ऑफ लॉरिस्टर्स संघटना उभारण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
- महाबळेश्वरमध्ये जाणाऱ्या पर्यटकांसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय !
- ‘हे’ झाड चुकूनही घराशेजारी लावू नका, नाहीतर साप तुमच्या घरीच मुक्कामाला असणार; या झाडाला म्हणतात सापाचे दुसरे घर
- MCX Report : सोन्याच्या वायद्यात ३,२२१ रुपये आणि चांदीच्या वायद्यात ३,४४२ रुपयांची वाढ
- टाटा मोटर्सचा मास्टरप्लॅन ! 2025 मध्ये नव्या सात गाड्या लाँच करण्याची तयारी, पहा संपूर्ण यादी
- DRDO Bharti 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटना अंतर्गत सायंटिस्ट पदाची भरती सुरू; त्वरित अर्ज करा