पोलीस असल्याचे भासवणाऱ्या नगरच्या भामट्यास पुण्यात अटक

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-पोलिसांची खाकी व तिचा दरारा आजही जनमानसात आहे वर्दीचा असलेला धाक पाहता नगराच्या एका पठ्याने चक्क पोलीस असल्याचे भासवले खरे पण हे प्रकरण त्याच्याच अंगलट आले, दरम्यान हा सर्व प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे.

पोलिस अधिकारी असल्याचे भासवत पोलिसांचा गणवेश परिधान करून पत्नीच्या बँकिंग परीक्षेसाठी पुण्यात आलेल्या एका तोतया पोलिसाला वानवडी पोलिसांनी अटक केली.

भाऊसाहेब महादेव गोयकर (वय -25 वर्षे, रा. गुरव पिंपरी, थीटे वाडी, अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वानवडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी त्यांना पोलिसांच्या गणवेशातील एक व्यक्ती दिसला. पण त्याच्याकडे पाहून त्याच्यावर संशय आला. त्याच्या खांद्यावर ‘मपो’ ऐवजी मपोसे असे लावले होते.

पोलिसांनी त्याच्याकडे ओळखपत्राची मागणी केली. पण त्याच्याकडे ओळखपत्र नव्हते. तर तो उडवा उडवीचे उत्तरे देऊ लागला.

त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता पोलीस नसल्याची कबुली दिली.त्यानंतर पोलीसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशीत त्याने सांगितले की

लॉकडाऊनमध्ये आपण पोलिस भरतीत आले आहोत असे खोटे पत्नीला सांगितले होते. त्यामुळे पत्नीला खरे वाटावे म्हणून तो गणवेश घालून रामटेकडी येथे पत्नीसोबत बँकिंगच्या परीक्षेसाठी आला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News