राष्ट्रवादीने काढलेल्या यात्रेला कार्यकर्तेही जमत नाहीत !

Published on -

पाथर्डी : राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू असलेल्या शिवस्वराज्य यात्रेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच खिल्ली उडवली.

त्यांनी (राष्ट्रवादी) काढलेल्या यात्रेला कार्यकर्तेही जमत नाहीत अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडविली.

महाजनादेश यात्रेनिमित्त पाथर्डीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. यावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, की दोन्ही काँग्रेस सत्तेवर असताना त्यांची माजोरी आणि मुजोरी जनतेने अनुभवली. सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर त्यांनी पाच वर्षे जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले.

महाजनादेश यात्रा काढल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने यात्रा काढली. उशिरा का होईना मतदार हा राजा आहे, आपण नाही हे त्यांना कळाल्याचे ते म्हणाले.

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा भाग दुष्काळमुक्त करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe