पारनेरमधील शिवसेनेचे पाच नगरसेवक परत पाठवा, उद्धव ठाकरे यांचा अजित पवारांना निरोप !

Published on -

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : पारनेर नागरपंचायतीतील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेले पक्ष प्रवेश उद्धव ठाकरेंना फार रुचलेले दिसत नाही.

त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी वाढू नये यासाठी शिवसेनेने फुटलेल्या नगरसेवकांना परत पाठवण्याचा निरोप अजित पवार यांना दिल्याची माहिती मिळत आहे.आता राष्ट्रवादी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

पारनेर तालुक्यात शिवसेनेला रामराम ठोकत पारनेर नगरपंचायतीच्या पाच नगरसेवकांनी 4 जुलै रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

अशातच, पारनेरमधील शिवसेनेचे पाच नगरसेवक परत पाठवा, असा निरोप उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना दिला आहे.

परंतु, हा निरोप शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत फोन करून अजित पवार यांच्यामार्फत पोहोचवला आहे.एका मराठी वृत्तवाहिनीने असे वृत्त दिले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe