- महाराष्ट्रात 1 लाख 8972 चाचण्या, त्यापैकी 1 लाख 1162 नमुने निगेटिव्ह आले आहेत
- वरळीतील परिस्थिती हाताळल्याबद्दल केंद्राकडून कौतुक
- मुंबईत कंन्टोन्मेंट झोन कमी होत आहेत
- कोरोनाग्रस्तांसाठी मुंबईत ठिकठिकाणी केंद्र उभारण्यात आली आहेत.
- त्यासाठी खासगी दवाखाने, डॉक्टर यांना सरकारकडून पूर्ण मदत मिळेल
- कोरोना नसणाऱ्यांची गैरसोय होत आहे
- सर्व वयाचे कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होत आहेत. पण त्यासाठी लवकरात लवकर दवाखान्यात दाखल व्हा
- सर्दी ताप खोकला अंगावर काढू नका, त्वरित फिवर क्लिनिक गाठा
- रक्तदाब, मधुमेह आणि अऩ्य आजार असणाऱ्यांनी स्वतःची काळजी घ्या
- महाराष्ट्रात जिल्हांतर्गत हालचालींना सुरुवात
- गर्दी टाळूनच पुढे जाता येईल
- सोशल डिस्टन्सिंग म्हणजे एकमेकांपासून शारीरिक अंतर राखा, मनात अंतर नव्हे
- विषाणू आपल्या संयमाची परीक्षा बघत आहे
- कोरोनाला रोखण्यासाठी गाफील राहून चालणार नाही
- वर्दळ वाढवून चालणार नाही.
- आपला महाराष्ट्र कोरोना मुक्त करायचा
- चूक झाल्यास सांगा, सुधारणा सांगा अशी विनंती
- केंद्राच्या पथकाकडे त्रयस्थपणे निरीक्षण करण्याची विनंती
- केंद्राचं पथक आपल्याकडे मुक्कामी आहे
- केंद्राकडे डाळ आणि गव्हाची मागणी
- कोरोनाची कोणतीही परिस्थिती लपवलेली नाही
- पण हे सगळं अत्यंत संयमाने करण्याची गरज आहे
- शक्य होईल तेव्हा अनेक राज्ये एकमेकांच्या मदतीने पुढचा मार्ग काढतील
- ट्रेन सुरू होणार नाहीत. मजुरांसाठी ज्या सूचना असतील त्या सरकारतर्फे मिळतील
- त्यासाठी नितीन गडकरी यांचे आभार
- अशा परिस्थितीत राजकारण न करता महाराष्ट्र सरकारच्या बाजूने उभे राहण्याचं गडकरी यांचं आवाहन
- केंद्रात आणि राज्यात एकोपा असताना काही जण अजूनही राजकारण करत आहेत
- मी या परिस्थितीत राजकारण बाजूला ठेवत आहे
- सरकार एकही प्रयत्न करणं सोडत नाही आहोत.
- लॉकडाऊनमुळे आपण कोरोनाचा गुणाकार रोखू शकत आहोत
- लॉकडाऊनचे काही चांगले वाईट परिणाम आहेत
- प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहेत
- कुणाहीवर पटकन संशय व्यक्त करण्याआधी परिस्थितीचा विचार केला पाहिजे
- हे दोन पोलीस कोरोना युद्ध लढता लढता शहीद झाले आहेत
- पोलीस आपल्यासाठीच झटत आहेत.
- आपण सगळेच परीक्षा देत आहोत
- कोरोना लढ्यात बळी गेलेल्या दोन पोलिसांना श्रद्धांजली
- आपल्या सेवेसाठी झटणाऱ्यांचा आदर करणं गरजेचं
- आपल्यासाठी अहोरात्र झटणारे जे कुणी आहेत, त्यांच्यात देव आहे
- तुम्ही जे संयम पाळताय त्यात देव आहे
- मुस्लीम धर्मींयांनी आपले नमाज घरातच अदा करावेत, गर्दी करू नका
- सर्वधर्मियांनी देशकर्तव्याला आणि माणुसकीला प्राधान्य दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद
- पण आपण लढा देत आहोत
- हे दिवस किंवा हे संकट कुणालाच अपेक्षित नव्हतं
- दिवस सगळे सारखे झाले आहेत.
- सर्व दिनदर्शिका दीन झाल्या आहेत.
- आज नेमकं काय आहे, हे नेमकं लक्षात येत नाही
- अक्षय्य तृतीया आणि अन्य सणांच्या सर्वांना शुभेच्छा
महाराष्ट्रात जिल्हांतर्गत हालचालींना सुरुवात … वाचा काय म्हणाले उद्धव ठाकरे Live Updates
Ahmednagarlive24
Published: