बाळ बोठेला  मदत करणाऱ्यांना सहआरोपी करा !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :-रेखा भाऊसाहेब जरे हत्येतील प्रमुख सूत्रधार पत्रकार बाळ जगन्नाथ बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यापूर्वी न्यायालयाने पोलिसांना म्हणणे सादर करण्याचे आदेश मंगळवारी दिले.

११ डिसेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, बोठे नाशिकमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सोमवारी तेथे छापा टाकला. मात्र, तत्पूर्वीच तो पसार झाला होता.

बोठे गेल्या सहा दिवसांपासून तो पोलिसांना चकवा देत आहे. अटकपूर्व जामिनासाठी त्याने वकील महेश नवले यांच्यामार्फत अर्ज दाखल केला आहे.

त्यावर सुनावणी घेण्यापूर्वी न्यायालयाने पोलिसांना नोटीस जारी करत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले. बोठेच्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करावी,

अशी मागणी अॅड. सुरेश लगड यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली. फरार होण्यास मदत करणाऱ्यांना सहआरोपी करावे, असे निवेदनात म्हटले आहे. रेखा जरे हत्याप्रकरणी न्यायालयाने पोलिसांचे म्हणणे मागवले

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment