आ. विखे यांनी कैकाडी महाराजांबद्दल व्यक्त केली ‘ही’ भावना ; म्हणाले…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-  संत कैकाडी बाबांचे पुतणे आणि येथील संत कैकाडी महाराज पुण्यधाम मठाचे विश्वस्त, प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. रामदास महाराज कैकाडी (जाधव) (वय 77) यांचे नुकतेच निधन झाले.

त्यांच्या निधनाने वारकरी सांप्रदायामध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर ‘कैकाडी महाराजांच्या निधनाने वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समतेचा संदेश देणारा समाज प्रबोधनकार काळाच्या पडद्या आड गेला आहे.

प्रवरा परिवाराने आयोजित केलेल्या धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमास कैकाडी महाराजांची राहिलेली उपस्थिती हा आमच्यासाठी आठवणींचा ठेवाच असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

कैकाडी महाराज आणि प्रवरा परिवाराचा ॠणानुबंध खूप वर्षांचा होता. पद्मभूषण खासदार आणि कैकाडी महाराजांची सामाजिक प्रश्नांवरची मत खूप ठाम होती.

जातीपातीच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार करणारे वारकरी संप्रदायातील एक आदराचे व्यक्तिमत्त्व म्हणून महाराजांची ओळख संपूर्ण आध्यात्मिक क्षेत्रात होती असेही आ.विखे म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment