दिलासादायक! कोरोना लसीची चाचणी यशस्वी?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- कोरोनाने संपूर्ण जगास जेरीस आणले आहे. जगातील सर्वच वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञ लस तयार करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत.

यात एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातील जेनर इन्स्टिट्यूटने कोरोनाला रोखण्यासाठी लस विकसित केली असून याची चाचणी छोट्या माकडांवर केली आहे.

या चाचणीचा अहवाल निष्कर्ष आश्वासक असल्याचं विद्यापीठाकडून सांगण्यात येत आहे.

भारतातील पुण्याची सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया ही संस्था ऑक्सफर्डच्या लस संशोधन प्रकल्पात भागीदार आहे.

कुठल्याही नव्या आजाराशिवाय फुफ्फुसाचे नुकसान रोखण्यात “ChAdOx1 nCoV-19” लस परिणामकारक ठरली आहे.

SARS-CoV-2 या विषाणूमुळे जगात कोरोनाचा फैलाव झाला. त्यामुळे SARS-CoV-2 हा डोस सहा माकडांना देण्यात आला. लवकरच या लसीच्या तिसऱ्या टप्प्याला मानवी चाचण्या सुरु होणार आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment