अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :-गेल्या अनेक महिन्यांपासून देशासह राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना या व्हायरसने आता हळूहळू महाराष्ट्र राज्यातून माघार घेतली आहे. यामुळे दिवसेंदिवस धडकी भरवणरे आकडे आता चांगलेच कमी झाले आहे.
यातच राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असून हे प्रमाण 92.49 टक्के एवढे झाले आहे. आज 3 हजार 001 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 16 लाख 18 हजार 380 झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज (16 नोव्हेंबर) 02 हजार 335 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.
तर 03 हजार 01 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, आता दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने नागरिकांनी अधिक जबाबदारीने वागणे महत्त्वाचे आहे.
सध्या राज्यातील मृत्यूदर 2.63 % एवढा आहे. राज्यात 7,48,226 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 5,395 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved













