कोरोना पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध करा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- काळे तसेच कोल्हे साखर कारखाने किंवा त्यांच्या हिताच्या संस्था निवडणूक बिनविरोध करतात. त्याचप्रमाणे सध्या होऊ घातलेला ग्रामपंचायती निवडणुकाही कोरोना पार्श्वभूमीवर त्यांनी बिनविरोध करून द्याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीनराव शिंदे यांनी केली.

तालुक्यातील काही महत्त्वाच्या कार्यकर्त्यांबरोबर शिंदे यांची शनिवारी बैठक झाली.यावेळी शिंदे म्हणाले, कोल्हे-काळे-परजणे सर्व जण एकत्र येऊन साखर कारखाने, दूध संघ बिनविरोध करतात. या ठिकाणी आपल्या बगल बच्चांच्या नेमणुका करून सच्चा कार्यकर्त्यावर अन्याय केला जातो.

मात्र, तालुक्यातील अन्य निवडणुकीत घराघरात भांडणे लावून आपापसात निवडणुका लढवायला लावतात. यामध्ये जनतेची फसवणूक करतात. तालुका बाजार समिती जशी सर्व जण एकत्र आले व मिळून सत्ता उपभोगत आहेत.

तसेच जर त्यांनी राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, काँग्रेस, आरपीआय, शेतकरी संघटना व आणि सर्वच पक्षांच्या गावागावांतील कार्यकर्त्यांना एकत्र करून

त्यांना उमेदवारी देऊन तालुक्यातील सध्या होणाऱ्या ग्रामपंचायती निवडणुका बिनविरोध कराव्यात. कारण कोरोना पार्श्वभूमीवर हे गरजेचे आहे, असे नितीनराव शिंदे यांनी म्हटले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment