‘अहमदनगर :- तुमच्यात बदल व्हावा म्हणून आम्ही सातत्याने संगमनेरला येतच राहणार. आता देश बदलत आहे, तुम्हीही बदला,’ असा सूचक सल्ला ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरमधील व्यापाऱ्यांना दिला.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी मिळण्यापासून ते विजयापर्यंतच्या सर्वच घडलेल्या घडामोंडीचा मार्मिक आढावा विखे पाटील यांनी दिलखुलास गप्पांमधून व्यापाऱ्यांपुढे उलगडून दाखविला. यातील ‘संगमनेर’ची भूमिकाही त्यांनी सांगितली.

एका खासगी कार्यक्रमासाठी विखे यांनी बुधवारी (२९ मे) पुन्हा संगमनेरला हजेरी लावली. दोनच दिवसांपूर्वी घुलेवाडी येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वपूर्ण होता.
विखे यांचे मुंबई येथून थेट मालपाणी हेल्थक्लबवर आगमन झाले. उद्योगपती मनीष मालपाणी, व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष निलेश जाजू, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक किशोर नावंदर, मनीष मणियार यांच्यासह शहरातील व्यापारी उपस्थित होते
लोकसभा निवडणुकीनंतर विखे यांनी संगमनेरवर लक्ष दिल्याचे दिसून येते आहे. भविष्यात विखे-थोरात यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची ही नांदी आहे.
केवळ भेटच नाही, तर राजकीय चर्चा आणि भेटीगाठीही ते संगमनेरमध्येच घेत असल्याचे आमदार अब्दुल सत्तार आणि जयकुमार गोरे यांच्या भेटींवरून दिसून येते
- 2025 Kia Seltos आता आणखी स्वस्त ! दमदार इंजिन, जबरदस्त मायलेज आणि अधिक फीचर्स
- 34km मायलेज देणारी मारुती कार फक्त दोन लाखांत मिळणार जाणून घ्या ऑफर
- ब्लॅक लुकमध्ये आली नवी स्कॉर्पिओ एन कार्बन एडिशन – किंमत, फीचर्स आणि इंजिनबाबत संपूर्ण माहिती
- Tata Punch EMI Plan : फक्त 1 लाख रुपयांत घरी आणा टाटा पंच ! पहा पूर्ण फायनान्स प्लॅन
- Realme Neo 7x 5G लाँच! 6000mAh बॅटरी, शक्तिशाली प्रोसेसर आणि दमदार फीचर्स