काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीच्या आमदाराला म्हंटले ‘गुंड’

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी यांच्यामध्ये गठबंधन होत राज्यात सत्ता स्थापन करण्यात आली. मात्र आता नगर शहरातील काँग्रेस पक्षातील एका पदाधिकाऱ्याने शहरातील राष्ट्रवादीच्या आमदाराला चक्क गुंड म्हणून संबोधले आहे.

यामुळे आता या दोन पक्षांमध्ये वादाची ठिणगी पेटली आहे. काँग्रेसच्या शहरजिल्हाध्यक्षाने राष्ट्रवादीच्या आमदाराला गुंड म्हटले तर प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने काँग्रेसच्या शहराध्यक्षावर खंडणीचा आरोप केला आहे.

शहरातील एका व्यापाऱ्याला मारहाण झाल्याच्या प्रकरणावरून या दोन पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमधील जुना वाद उफाळून आला आहे.

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी यातील हल्लेखोर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे समर्थक असल्याचा आरोप करताना जगताप यांचा गुंड असा उल्लेख केला आहे.

जगताप समर्थकांकडून आपल्यालाही धमकावल्याचा आरोप काळे यांनी केला आहे. तसेच काळे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

शहरात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली काँग्रेसची घोडदौड रोखण्यासाठी ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याचे धमकावल्याचा आरोप काळे यांनी केला आहे.

काळे यांच्या आरोपांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजित खोसे यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, काळे केवळ प्रसिद्धीसाठी जगताप यांच्यावर आरोप करीत आहेत.

मात्र, आता ते जबाबदार पदावर आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जगतापांनी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांचा पराभव केला होता. काळे हे थोरात व तांबे यांचे समर्थक आहेत.

त्यामुळे जुन्या पराभवाचा वचपा काढण्यासाठीच थोरात व तांबे यांच्या सांगण्यावरूनच काळे हे जगताप यांच्यावर आरोप करीत आहेत. यासंबंधी आता आम्हीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांकडे तक्रार करणार आहोत.

तसेच कायदेशीर कारवाईही करणार आहोत, असेही खोसे यांनी म्हटले आहे. यावादावर राज्यात सत्तेत एकत्र असलेले या दोन्ही पक्षांचे नेते काय मार्ग काढतात, याकडे लक्ष लागले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment