राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदाराचे साईबाबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य

Published on -

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- साईबाबांची जन्मभूमी पाथरी असल्याचा उल्लेख राष्ट्रपतींनी केला. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी साईबाबांची जन्मभूमी पाथरीसाठी 100 कोटी रुपये मंजूर करून साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण झाला.

हे पण वाचा :- जिल्हा परिषेदतील राष्ट्रवादीच्या सहा सदस्याचे निलंबन 

त्यानंतर शिर्डी बसस्थानकावर साईबाबांच्या जन्मभूमी पाथरीसाठी बस सोडण्याबाबतचा फलक लावल्याने वाद निर्माण झाला होता. त्यामुळे पाथरीचे आमदार बाबा जानी दुर्राणी यांनी साईबाबांची जन्मभूमी पाथरी तर कर्मभूमी शिर्डी असून शिर्डीकरांना कशाची भीती वाटते असे वक्तव्य करुन एका नवीन वादाला तोंड फोडले आहे.

हे पण वाचा :- अखेर अहमदनगर भाजप जिल्हाध्यक्षांची निवड झाली ! नावे वाचून तुम्हालाही धक्का बसेल …

साईंची जन्मभूमी नगर जिल्ह्यातील शिर्डी की, परभणी जिल्ह्यातील पाथरी असा साईबाबांच्या जन्मस्थळावरुन वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. साईबाबांच्या समाधी शताब्दी महोत्सवाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती आले असता त्यावेळी साईबाबांची जन्मभूमी पाथरी असल्याचा नामोल्लेख त्यांनी केला होता.

हे पण वाचा :- वडिलांच्या श्राध्दावरून परतणाऱ्या मुलाचा अपघातात मृत्यू

त्यानंतर शिर्डी बस स्थानकावर साईबाबांच्या जन्मभूमी पाथरीसाठी बस सोडण्याबाबतचा फलक लावल्याने वाद निर्माण झाला होता. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी साईबाबांची जन्मभूमी पाथरीसाठी 100 कोटी रुपये मंजूर केले. त्यामुळे या वादाला तोंड फुटले होते. शिर्डी शिवाय साईबाबांचा कुठेही उल्लेख नसावा.

हे पण वाचा :- चार वर्षे झाली तो बेपत्ता आहे ! वयोवृध्द आई म्हणाली बाळा अजिंक्य! तू जिथं असशील….

कारण साईबाबांच्या जन्मभूमीचा उल्लेख कशातच नसल्यामुळे नाहक पाथरीला साईबाबांच्या जन्मस्थानाचा दर्जा देऊन साईभक्तांमध्ये एक नवीन वाद निर्माण केला जात आहे. त्यामुळे पाथरीला जन्मभूमीचा दर्जा देण्यास शिर्डीकरांचा तीव्र विरोध आहे.

हे पण वाचा :- सत्ता जाताच देवेंद्र फडणवीस यांना आली शनिची आठवण !

याबाबत पाथरीचे आ. बाबाजानी दुर्राणी यांनी सांगितले की, साईबाबांची जन्मभूमी पाथरी असून कर्मभूमी शिर्डी आहे. त्यामुळे जन्मभूमी पाथरीचा उल्लेख केला तर शिर्डीचा दर्जा कमी होणार नाही.

हे पण वाचा :- सुजित झावरेंचा हल्लाबोल : वसंतरावांचा विसर पडल्याने राहुल झावरे बेदखल झाले !

भाविक शिर्डीला आल्यानंतर पाथरीलाही येतील आणि पाथरीला आल्यानंतर शिर्डीलाही जातील. हा वाद निर्माण करुन शिर्डीकरांना भीती कशाची वाटत आहे. त्यामुळे अशा प्रकारचा वाद निर्माण करण्याचे काहीही कारण नाही.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe