जामीनदार न झाल्याने आतेभावाचा खून करणार्या आरोपीस जन्मठेप !

Published on -

अहमदनगर :- जेलमध्ये असताना जामीनदार झाला नाही.याचा राग धरून आरोपी ज्ञानेश्वर चंद्रकांत काळे, रा.वडुले बु. काळे वस्ती ता.शेवगाव.याने त्याचा आतेभाऊ मयत संदिप दत्तात्रय जर्गे याचा चाकूने भोसकून खून केल्याच्या आरोपावरून जिल्हा न्यायाधीश क्र. २ श्री.अशोककुमार भिल्लारे यांनी आरोपी ज्ञानेश्वर काळे याला जन्मठेप व १०,००० रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.

या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील ॲड.सतिश कि.पाटील यांनी काम पाहिले. या खटल्याची माहिती अशी की, सन ऑगस्ट २०१८ मध्ये आरोपी ज्ञानेश्वर काळे याने वडिल चंद्रकांत भिमाजी काळे यांना शिवीगाळ करून मारहाण केली व त्यांच्या डाव्या हाताला चावा घेवून त्यांच्या बोटाची कांडी तोडली होती

.त्यामुळे वडिलांनी आरोपीविरूध्द फिर्याद दिल्याने शेवगाव पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर याला अटक केली होती.तो शेवगाव जेलमध्ये असताना मयत संदिप व फिर्यादी वडिल त्याला भेटण्यासाठी गेले.त्यावेळी आरोपी ज्ञानेश्वर मयत संदीपला म्हणाला,तु मला जामीनदार हो,त्यास संदिपने नकार दिला.

याचा राग धरून आरोपी ज्ञानेश्वर याने दि.२९/१२/२०१८ रोजी सायं.७:३० वा.चे सुमारास आतेभाऊ मयत संदिप दत्तात्रय जर्गे यास त्याचे मोबाईलवर शिवीगाळ केली.यावेळी साक्षीदार व मयत संदिप हे आरोपी ज्ञानेश्वरच्या घरी गेले असता

त्याने त्यांना शिवीगाळ करून मयत संदिप व त्याचा भाऊ बापु यांना पाठीवर चावा घेतला व खिशातील चाकूने मयत संदिप याचे छातीवर वार करून गंभीर जखमी केले.जखमीला उपचारार्थ शेवगावच्या दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe