अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीमध्येही पोहोचला कोरोना,आढळले ‘इतके’ रुग्ण !

Published on -

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यासह पारनेर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येत वाढत आहेत आज अहमदनगर जिल्ह्यात तब्बल 341 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. 

तसेच जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या गावातही कोरोनाचे सहा रुग्ण आढळले आहेत. राळेगणसिद्धी गावातील सहाजणांचा खाजगी लॅबमधील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

आज येथे आढळलेले रूग्ण हे मुंबई येथील आहेत. ते कोरोनामुळे राळेगणसिद्धी येथे आले आहेत. मात्र, त्यांच्या एका नातेवाईकाचे निधन झाल्याने ते दशक्रिया विधीच्या कार्यक्रमासाठी गेले होते.

गावात आल्यानंतर त्यांना गावातीलच शाळेत क्वारंटाइनही केले होते. त्या दरम्यान त्यांचे स्वॅब घेण्यात आले. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe