कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर पाच हजार पार ! आज आढळले ‘इतके’रुग्ण …

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोनाबाधित रुग्ण संख्यने पाच हजारचा आकडा पार केला आहे,गेल्या चोवीस तासात अहमदनगर जिल्ह्यात तब्बल ५३५ रुग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यात काल (शुक्रवारी ) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५३५ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये ३४, अँटीजेन चाचणीत २८४ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या २१७ रुग्णांचा समावेश आहे.

यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १७९५ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज २७९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ३६३९ इतकी झाली.

काल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत २४ रुग्ण बाधित आढळून आले होते. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०९ नेवासा १३, जामखेड ०२ अशा २४ रुग्णांचा समावेश होता.

त्यानंतर आणखी १० रुग्णांचा अहवाल बाधित आढळून आला. यात, नेवासा ०१- चांदा, अहमदनगर शहर-०२, अकोले ०७- शेरणखेल ०४, रेडे ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २८४ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, संगमनेर २७, राहाता ०९, पाथर्डी २५, नगर ग्रामीण १५, श्रीरामपुर १२, कॅन्टोन्मेंट १३, नेवासा २०, श्रीगोंदा ६०, पारनेर १७, राहुरी ०६, शेवगाव ४३, कोपरगाव १२, जामखेड २२ आणि कर्जत ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २१७ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १७५, संगमनेर ०५, राहाता १३, पाथर्डी ०४, नगर ग्रामीण ०५, श्रीरामपूर ०४, कॅन्टोन्मेंट ०१, नेवासा ०१, श्रीगोंदा ०१, पारनेर ०४, शेवगाव ०२, कोपरगाव ०१ आणि कर्जत येथील ०१ रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या: ३६३९
  • उपचार सुरू असलेले रूग्ण: १७९५
  • मृत्यू: ७४
  • एकूण रूग्ण संख्या: ५५०८
      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment