पोलीस प्रशासन हादरलं ; ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Published on -

महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती भयानक झाली आहे. परंतु याही परिस्थितीत परिस्थिती नियंत्रित ठेवण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित व्यवस्थित ठेवण्यासाठी राज्यातील पोलीस सदैव उभे आहेत.

परंतु आता पोलीस विभागात कोरोनाची लागण अधिक झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात 1192 पोलीस कर्मचारी हे पॉझिटिव्ह आढळले आहेत. वेगवेगळ्या शहरात तब्बल 12 पोलिसांना या रोगामुळे मृत्यू आला आहे.

त्यात सर्वाधिक मुंबई शहरातील सात पोलीस आहेत तर एक वरिष्ठ अधिकारी आहे पुणे सोलापूर शहर नाशिक ग्रामीण अशा शहरांमध्ये देखील प्रत्येकी एक असे मृत्यू झाले आहेत.

यात राज्यातील PSI, API, PI, IPS असे 136 पोलीस अधिकारीही समाविष्ट आहेत. राज्यात मुंबई शहरात मोठ्या संख्येने पोलिसांमध्येेे लागण होत असल्याने त्यांचे मनोबल कमी होणार नाही याची काळजी सरकार घेत आहे.

पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी सरकारही अनेक उपक्रम राबवत आहे. नागरिकांनी योग्य सहकार्य केलं तर पोलिसांवरचा बरासचा ताण कमी होईल असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News