कल्याण-डोंबिवली महापालिकेत कोरोनाचा शिरकाव ; मोठा अधिकारी कोरोनाग्रस्त

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- कल्‍याण मुंबई, ठाण्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आता कोरोनाने कल्याण-डोंबिवलीतही वेग घेतले आहे. आता तर कल्याण-डोंबिवलीत आरोग्य विभागातील अधिकारी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.

त्यामुळे चिंताजनक वातावरण झाले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासकीय इमारत, अल्पबचत भवन व सचिव कार्यालयाची इमारत सॅनेटाईज करण्यात येणार आहे. यासाठी बुधवारी कार्यालयीन कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.

कल्याण डोंबिवलीतील कोरोनाच्या आकड्याने अवघ्या काही दिवसांतच 800 च्यावर आकडा गेला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.

महापालिका क्षेत्रात रूग्णांवर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पालिका प्रशासनाकडून सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत.

मात्र मुंबई, ठाण्यात नोकरीला जाणा-या कर्मचा-यांना कोरोनाची लागण होत असून त्यांच्या संपर्कातील लोकांनाही करोनाचा संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच रूग्णांमध्ये लहान बालक आणि मुलांचंही प्रमाण वाढत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment