कोरोना दैनंदिन जीवनाचाच एक भाग, खा.शरद पवार म्हणतात…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : प्रत्येक नागरिकाची कोरोनासह जगायच्या संबंधीची तयारी असली पाहिजे. कोरोना हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग होतोय, अशी भूमिका तज्ज्ञांकडून मांडली गेली आहे.

ती गृहीत धरून पुढे जाण्याच्या संबंधीचा विचार करावा लागेल असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांची एक खास मुलाखत घेतली आहे.

यावेळी त्यांनी हे मत मांडले. पुढे ते म्हणाले जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून कोरोनाचा ट्रेंड खाली जाईल. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तो नॉर्मलवरती येईल, पण याचा अर्थ तो कायमचाच संपला असा घेण्याचं कारण नाही.

तो रिव्हर्सही होऊ शकतो. त्यामुळे या सगळ्या काळात आपल्याला कोरोनाच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल, असंही शरद पवारांनी संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment