अहमदनगर लाईव्ह24 टीम :- भारतात कोरोनाचे नवे रुग्ण आणि बळींचा आकडा वाढण्याचा वेग कमी आहे, अशी दिलासादायक माहिती शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. राज्यात ४७ नवे रुग्ण आढळल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या ५३७ वर गेली आहे.
कोरोनामुळे देशात आतापर्यंत ९६ जण दगावले असून रुग्णांचा आकडा ३ हजार ४८२ झाला आहे. यांमध्ये तबलिगी जमातशी संबंधित १ हजाराहून अधिक लोक आहेत.
देशातील १७ राज्यांमधील तबलिगी जमातचे सदस्य आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या सुमारे २२ हजार जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात शनिवारी कोरोनाचे ४७ नवे रुग्ण आढळल्याने रुग्णांचा आकडा ५३७ झाला.
यांमध्ये सर्वाधिक ४३ जण मुंबई आणि परिसरातील आहेत तर पुण्यात २, पिंपरी-चिंचवडमध्ये एक आणि अमरावतीतील एका रुग्णाचा समावेश आहे. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत २६ जण दगावले आहेत.
५१ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशातील बळींची संख्या ९१ असून कोरोनाची लागण होऊन उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्या १८३ आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com