अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता यापुढील काळामध्ये जलद गतीने कोरोना चाचणीचे अहवाल येणे आवश्यक आहे.
यापूर्वी केवळ सर्दी खोकला ताप यासारखी लक्षणे असलेल्या रुग्णाला केवळ डॉक्टरांनी दिलेल्या चिट्ठी द्वारे चाचणी करता येत होती.
कोरोनाशी दोन हात करण्यास विखे पाटील हॉस्पिटल सज्ज झाले असून चाचणी अहवाल केवळ 8 तासात मिळणार असल्याची माहिती खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये सिविल हॉस्पिटलमध्ये यासाठी नमुने गोळा केले जात असायचे. सिव्हील हॉस्पिटल वरील वाढता ताण लक्षात घेतात रिपोर्ट येण्यास साधारणपणे 1 ते 2 दिवसाचा कालावधी लागायचा व त्याच दरम्यान संसर्गाचा धोका देखील वाढायचा.
चाचणी निकाल येईपर्यंत रुग्णावर कुठल्याही प्रकारचे उपचार करता येत नसल्याने त्याचे नातेवाईक अत्यंत मानसिक तणावात असायचे. दुसरीकडे खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणी केल्यानंतर ती कन्फर्म चाचणी म्हणून ग्राह्य धरली जायची नाही.
मात्र शासनाने ह्या पुढील काळामध्ये सामान्य नागरिकांना आपली स्वत:ची कोरोना चाचणी करण्याची मुभा दिली आहे. वाढती रुग्ण संख्या, रिपोर्ट येण्यासाठी लागणारा वेळ,
त्यामुळे वाढणारा धोका, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल मध्ये रॅपिड टेस्टिंग मशीन आजपासून उपलब्ध करण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews