पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे थैमान सुरूच; घेतला चौथा बळी

पुणे पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे थैमान सुरूच असुवुन रविवारी चौथा बळी गेला. भोसरी येथील ८१ वर्षीय महिलेचा पुण्यात उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात ८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील रुग्णांची संख्या १६९ झाली असून आतापर्यंत ८१ जण कोरोना मुक्‍त झाले आहेत.

यापूर्वी शहरात उपचार घेणारे मात्र हद्दीबाहेर रहिवासी असलेल्या चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ८ वर पोहोचला आहे, तर भोसरी परिसरातील आणखी एकाला करोनाची बाधा झाली आहे.

भोसरी येथे राहणाऱ्या एका ८१ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली होती. तिच्यावर पुण्यात उपचार सुरू होते. रविवारी या महिलेचा मृत्यू झाला.

पिंपरी-चिंचवड शहरात आतापर्यंत चार जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या शहराच्या हद्दीबाहेरील चौघांचा मृत्यू झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment