अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :- पुण्यात सध्या पुन्हा कोरोनाचे प्रमाण वाढताना दिसतआहे. नागरिकांनी आवश्यक ती आरोग्याची काळजी घ्यावी. कोरोनाची वाढलेली स्थिती नक्कीच नियंत्रणात येईल. असं मला खात्रीपूर्वक वाटत आहे.
तसेच पुण्यात आज कोरोना रुग्णांना बेड अडचण नाही आहे. तरी नवीन 4000 ऑक्सिजन बेड आम्ही वाढवतोय, त्यात आयसीयू बेड पण वाढवत आहोत. अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
ते आज पुण्यात कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. खाजगी हॉस्पिटलच्या कारभारात सरकार लक्ष देईल. खाजगी हॉस्पिटलमध्ये ८० टक्के बेड मिळावे म्हणून दोन अधिकारी नेमले आहेत.
रुग्णांचे बिल तपासले जावे म्हणून आम्ही ऑडिटेर नेमले आहेत. जर बिल रूग्णालयाकडून जास्त दिले जात असेल तर हा अक्षम्य गुन्हा आहे.
सरकारने बिलाच्या तपासणीसाठी भरारी पथक नेमले असून, त्याबाबतीत आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी जाऊन पाहणी करावी असे आदेशही देण्यात आले आहेत.
खाजगी हॉस्पिटलमध्ये जर 100 रुपये जास्त घेतले तर 500 रुपये वसूल करावे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. नाही ऐकले तर गुन्हा दाखल करण्याचेही अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत.
असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, लॉकडाऊन विषय आता थांबवला आहे. आता राज्यात टप्प्या टप्प्याने अनलॉक करायला सुरवात केली आहे. तरीही आपल्याला कोरोना सोबत काही महिने जगावे लागेल, त्यासाठी सर्व नियम अटी पाळणे आवश्यक आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved