पुणे महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरूच असून मुंबई खालोखाल पुण्यातही कोरोनाचे जास्त रुग्ण सापडत आहेत. रविवारी दिवसभरात नव्या २०१ रुग्णांची नव्याने भर पडली आहे. हे बाब पुण्याची चिंता वाढवणारी आहे.
सध्या रोज दीड हजार लोकांची तपासणी होत असल्याने रुग्ण संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. पुण्यात याआधी सर्वाधिक १६६ आणि त्यानंतर शनिवार २०२ रुग्ण सापडले होते.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2020/05/coronavirus-1.jpeg)
तेव्हा कोरोनामुक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेल्याने पुणेकरांमधील भीती कमी झाली होती. मात्र, शनिवारपासून अचानक नव्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
त्यात पुन्हा २०१ रुग्ण वाढले आहेत. गेल्या आठवड्यात पुणेकरांच्या आशा वाढविलेल्या कोरोनामुक्तांची संख्या कमी होऊन दिवसभरात ५३ बरे झाले आहेत.
तर जवळपास दीडशे रुग्णांची स्थिती गंभीर असून, नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवे रुग्ण आणि मृतांचे आकडे वाढल्याने पुणेकरांत पुन्हा भीती वाढली आहे. १,७५१ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन, ते आपापल्या घरी गेले आहेत.
तर आतापर्यंत १९४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या विविध रुग्णालयांत १५१५ रुग्ण असून, त्यात आज सापडलेल्या २०१ रणांचा समावेश आहे. गंभीर बाब म्हणजे, १४१ जणांची प्रकृती गंभीर आहे आणि त्यापैकीचे ४५ रुग्ण अत्यवस्थ स्थितीत आहेत.