कोरोनाच्या लढ्यात पोलीस प्रशासन महत्वपूर्ण जबाबदारी पार पडत आहे. परंतु सर्वतोपरी सुरक्षा घेऊनही पोलिसांना याची लागण झालेली आहे.
राज्यातील ८८७ पोलीस कोरोनाग्रस्त झाले असून मुंबईतील चार, पुणे, सोलापूर शहर, नाशिक ग्रामीण भागात प्रत्येकी एक अशा सात पोलिसांना जीव गमवावा लागला आहे.
91 पोलिस अधिकारी आणि 796 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह सापडले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत.
परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करत आहेत. अशा हल्लेखोरांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिस विभागाला देण्यात आलेले आहे तसे ते म्हणाले.
यादरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या 207 घटना घडल्या. त्यात 747 व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे असे गृहमंत्र्यांनी सांगितले.