अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नगरमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने नगर जिल्ह्यातील लोकांना येण्यास बंदी करावी या हेतूने वृद्धेश्वरच्या घाटात दगड माती टाकून हा रस्ता काही लोकांनी बंद केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला.
कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात थैमान घातलेले असताना आता या कोरेमुळे अंतर्गत सीमावाद देखील सुरू झाले आहेत. नगर व बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या वृद्धेश्वर घाटच दगड, माती टाकून काही व्यक्तींनी बंद करून टाकलाय.
नगरमध्ये कोरोणाचे रुग्ण आढळून आल्याने त्याचा संसर्ग मराठवाड्यातील गावांना होऊ नये म्हणून काही लोकांनी नगर-बीड जिल्ह्यातील लोकांना ये-जा करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा वृद्धेश्वर घाटातील रस्त्यावर बुधवारी दगड माती टाकून हा राज्यमार्गच बंद केला आहे.
यामुळे पाथर्डीहून आष्टी, कडा धानोऱ्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली. कोरोणामुळे या गावची माणसं त्या गावात येऊन न देण्याचे प्रकरण आता दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
बाहेरची व्यक्ती गावात येऊ नये व गावातील व्यक्ती बाहेर जाऊ नये याची विशेष खबरदारी आता गाव पातळीवर घेतली जात आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com