करोना बाधीत रुग्ण कोपरगावात आढळल्याने सर्वत्र स्मशान शांतता …

Ahmednagarlive24
Published:

कोपरगाव :- तालुक्यात पहीला करोना बाधीत रुग्ण आढळल्याने तहसीलदार योगेश चंद्रे यांनी आरोग्य विभाग, पोलीस ,नगरपालिका अधिकाऱ्यांची शनिवारी सकाळी तातडीची बैठक घेवून खबरदारी म्हणुन योग्य त्या उपाय योजना सुचविल्या.

करोना विषाणुची लागन इतरांना होवू नये म्हणुन १४ एप्रिल पर्यंत संपुर्ण शहरा शंभर टक्के लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बाधीत महीलेच्या परिसरातील आत्यावश्यक सेवा बंद करण्यात आल्या आहेत.

आता तरी कोपरगाव तालुक्यातील नागरीकांनी घराबाहेर पडू नये असे आवहान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तर ग्रामीण भागातील नागरीकांनी सध्या शहरात येण्याचे टाळावे असे आवहान पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी केले आहे.

करोना बाधीत रुग्ण शहरात आढळल्याने शहरात सर्वत्र स्मशान शांतता पसरली आहे. रस्त्यावर फिरणारे आता गल्लीत फिरताना दिसत नाहीत.

करोनाच्या दहशतीने नागरीक हवालदिल झाले आहेत.शहरातील बाधीत महीला राहत असलेला परिसर निर्जंतुक करण्यात आल्याची माहीती मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिली.

या महीलेने शहराच्या बाहेर कोठेच प्रवास केलेला नाही.करोनाची लागण झालेल्या काळात या महिलेने एका रिक्षामधुन शहरात प्रवास केल्याचे उघड झाले आहे. तसेच तिच्या घरी दुध देणारे दोन दुधवाले, पाण्याचा जार देणारा, यांच्याशी संपर्क आल्याचे पुढे येत आहे.

तसेच या महीलेला सर्वप्रथम उपचार करणारे डॉक्टर, परिचारीका,परिचारक,एक्सरे काढणारे तांत्रिक, व अन्य आरोग्य विभागातील कर्मचारी यांचाही संपर्क बाधीत महीलेशी आला आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील कर्मचारी चांगलेच धास्तावले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment