अहमदनगर लाईव्ह24 टीम :- आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील जनतेशी संवाद साधला यावेळी त्यांनी रविवारी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिट लाईट्स बंद करून बाल्कनी अथवा घरासमोर उभे राहून दिवे, मेणबत्ती, टॉर्च लावण्याचे आवाहन केले .
या त्यांचा आवाहनावर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली .
यामध्ये ट्विट करत ते म्हणाले थाळी – टाळीनंतर आता दिवे लावण्याचा कार्यक्रम सादर होणार आहे. देशाला इव्हेंटची नाही तर व्हेंटिलेटर , रुग्णालये आणि Covid – 19 चाचणी लॅबची गरज आहे.
हातावर पोट असणाऱ्या मजुरांना कामगारांना दोन वेळच जेवण हवं आहे . त्यामुळे हे प्रसिद्ध स्टंट बंद करून काहीतरी ठोस पावलं उचला असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
थाळी-टाळीनंतर आता दिवे लावण्याचा कार्यक्रम सादर होत आहे. देशाला इव्हेंटची नव्हे तर रुग्णालयं, व्हेंटिलेटर #COVIDー19 चाचणी लॅबची गरज आहे. हातावर पोट असलेले मजूर व कामगारांना दोन वेळचं जेवण हवं आहे. त्यामुळं @PMOIndia हे प्रसिद्धी स्टंट बंद करून काहीतरी ठोस पावलं उचला.@INCIndia pic.twitter.com/bqQjFn5RBC
— Balasaheb Thorat (@bb_thorat) April 3, 2020
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com