अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना न्यायालयाकडून मोठा दणका मिळाला आहे. वाशी टोल नाका तोडफोडप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे.
वाशी इथे दि.२६ जानेवारी २०१४ रोजी मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाषण केलं होतं. त्या भाषणात टोल नाके बंद करण्याचा उल्लेख होता. त्यानंतर नवी मुंबईमध्ये मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे आणि कार्यकर्त्यांनी वाशी टोल नाका फोडला होता.
टोलनाका फोडल्या प्रकरणी मनसे कार्यकर्ते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर वाशी न्यायालयाकडून आता नोटीस पाठवण्यात आली आहे. राज ठाकरे कोर्टात हजर राहीले नसल्याने त्यांना समन्स बजावण्यात आलं आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved