अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 : अहमदनगर शहरात दोन दिवसापासून संततधार पाऊस होतोय. या पावसाचे पाणी अनेक नागरिकांच्या घरात घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
त्यामुळे नागरिकांमुळे मनपाला मिळालेले थ्री स्टार रेटींगचे श्रेय लाटणारांचे पितळ पुन्हा एकदा पावसानेच उघडे पाडले. अशी टीका अभिषेक कळमकर यांनी केली आहे.

याबाबत माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी ट्वीट केले असून त्यात ते म्हणाले आहेत ”पावसामुळे नगर शहरातील पोलिस वसाहतीसह अनेक भागात पाणी तुंबलेय.
अनेकांच्या घरातही पाणी शिरले आहे. महापालिकेने केलेला नालेसफाईचा खर्च नेमका कुठे मुरला ? कारण पाणी तर आजिबातच मुरत नाहीय.”
⚡️पावसामुळे नगर शहरातील पोलिस वसाहतीसह अनेक भागात पाणी तुंबलेय. अनेकांच्या घरातही पाणी शिरले आहे. महापालिकेने केलेला नालेसफाईचा खर्च नेमका कुठे मुरला ? कारण पाणी तर आजिबातच मुरत नाहीय.@amcnewsupdates @SwachAhmednagar
— Abhishek Kalamkar (@abhishek_shivsn) June 29, 2020
आपली भूमिका मांडताना कळमकर म्हणाले नगरमध्ये दोन दिवसापासून पाऊस पडत आहे. एरव्ही सगळ्यांनाच आवडणारा पाऊस महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नगरकरांना नकोसा झालाय.
मे महिन्यात नालेसफाईवर मोठा निधी खर्च करण्यात आला. तो कुठे मुरला हे नगरच्या जनतेला कळले पाहिजे. कारण शहरात अनेक भागांत पाण्याचा निचरा न झाल्याने लोकांच्या घरात पाणी शिरून मोठं नुकसान होत आहे.
नागरिकांमुळे मनपाला मिळालेले स्टार रेटींगचे श्रेय लाटणारांचे पितळ पुन्हा एकदा पावसानेच उघडे पाडले. प्रशासनानेही नगर का तुंबते याचे उत्तर दिलेच पाहिजे. असेही कळमकर म्हणाले. यामुळे नाले सफाईवर केलेला खर्च वादात सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews