‘मॅन ऑफ द मॅच’ ठरलेल्या क्रिकेटपटूचा भीषण अपघातात मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

यवतमाळ :- क्रिकेट सामना खेळून परत जाणाऱ्या दोन क्रिकेटपटूंचा रस्ते अपघातात जागेवरच मृत्यू झाला आहे.

नागपूर-तुळजापूर राज्य महामार्गावर शनिवारी हा अपघात झाला. जयेश प्रवीण लोहिया (वय-10, रा.रामनगर वर्धा) अक्षद अभिषेक वैद (वय-11, रा.वर्धा) असे मृतांचे नावे आहे. ब्रदर हूड क्रिकेट क्लब, वर्धाचे हे क्रिकेटपटू होते.

या अपघाताबाबत सविस्तर माहिती अशी की, पद्मविलास क्रिकेट क्लबने यवतमाळ शहरातील गोधणी मार्गावर टी-20 सामन्यांचे आयोजन केले होते.

शनिवारचा सामना झाल्यानंतर वर्धेतील क्रिकेट क्लबचे क्रिकेटपटू कारने (एमएच-32 एएच 3777) पालकांसोबत वर्ध्याकडे निघाले होते.

दरम्यान, नागपूर तुळजापूर राज्य महामार्गावर चापडोह पुनर्वसनजवळ त्यांचे वाहन दुभाजकावर आदळले. ही धडक इतकी भीषण होती की, वाहनातील दोन क्रिकेटपटूंचा जागेवरच मृत्यू झाला. 

या अपघातातील मृत जयेश ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला होता. त्याने 6 बळी घेऊन आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. नागपूरकडे जात असताना चापडोह गावाजवळ हा भीषण अपघात झाला. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe