अंबाजोगाई : गणेश आगमना निमित्त काढलेल्या मिरवणुकीत नाचताना हृदयविकाराचा धक्का आल्याने एका ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.
ही घटना सोमवारी (दि.२) रात्री साडेआठ वाजेदरम्यान शहरातील रविवारपेठेत घडली. श्याम महादेव गोंडे (रा. पटाईत गल्ली, रविवारपेठ) असे मृत तरुणाचे नाव आहे.सोमवारी रविवार पेठेतील पटाईत गल्लीमधील तरुणांनी मूर्ती प्रतिष्ठापणा करण्यासाठी गणपतीच्या मूर्तीची खरेदी केली.

त्यानंतर वाजत-गाजत तिची मिरवणूक काढली. ही मिरवणूक रविवारपेठ गल्लीत आली तेव्हा श्याम महादेव गोंडे हा तरुण त्यात सामील झाले. आपल्या मित्रांसमवेत उत्साहात नाचत असताना गोंडेला अचानक भोवळ आली व खाली कोसळला.
यानंतर तरुणांनी श्यामला उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
- चुकूनही ‘या’ वस्तू घेऊन विमानात चढू नका; अन्यथा…, ही माहिती प्रत्येक प्रवाशाला माहीत असायलाच हवी!
- UPSC Jobs 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगात 462 जागांसाठी भरती सुरू – अर्ज करण्याची शेवटची संधी!
- निसर्गरम्य घाटात दुर्गंधीचा विघ्न! वारकऱ्यांच्या दिंड्यांना त्रास, प्रशासनाचे दुर्लक्ष
- पाकिस्तान-बांग्लादेशसह ‘या’ 26 देशात भारतीय रुपया ठरतो ‘किंग’; काही ठिकाणी तर ₹1 चे मूल्य 1000 पेक्षाही जास्त, पाहा यादी
- पेट्रोलपासून केशरपर्यंत…, भारत इराणकडून काय-काय खरेदी करतो?, सर्वसामान्यांच्या बजेटवरही होईल युद्धाचा परिणाम?