रस्त्यावर राडा करणाऱ्या नगरच्या मद्यधुंद तरुणीला पुण्यात अटक

Published on -

पुणे: गुरुवारी पहाटेच्या वेळी रस्त्यावर दारू पिऊन गोंधळ करणाऱ्या तरुणीला समजावून सांगण्यासाठी गेलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्याने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी मद्यधुंद तरुणीला अटक केली असून, सोनल सुनिल सद्रे (३०,रा. सद्रेवाडा भराड गल्ली अहमदनगर) असे तिचे नाव आहे. तरुणीला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

एक तरुणी ज्ञानेश्वर पादुका चौकात दारुच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या वेळी पोलिसांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केल असता तिने पोलिसांनाच शिवीगाळ करून मारहाण केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe