अहमदनगर :- भररस्त्यात महिलेस शिवीगाळ करत शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना नगर शहरात उघडकीस आली आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी कि, शहरात सिव्हील हडको कॉलनी गणेश चौक, तपोवन रोड साईनगर भागात राहणारी एक तरुण महिला
मिस्कीन मळा रोडने मुलाला शाळेतून घरी आणण्यासाठी जात असताना तेथे येवून आरोपी प्रशांत प्रभाकर सराईवार, रा. सिव्हील हडको कॉलनी, गणेश चौक
याने महिलेच्या हाताला धरुन लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करुन ओढून विनयभंग केला.
नोकरी केली तर तुझ्या मुलाला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देवून शिवीगाळ करत शरीरसुखाची मागणी केली.
पिडीत महिलेने या प्रकरणी वरीलप्रमाणे काल तोफखाना पोलिसांत फियांद दिल्यावरुन
आरोपी प्रशांत प्रभाकर सराईवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
- मोठी बातमी ! सरकारचं नवं फर्मान, आता मुस्लिमांना हिंदूंची जमीन खरेदी करता येणार नाही !
- शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी विप्रो कंपनीची मोठी घोषणा! आता हा आर्थिक लाभ मिळणार
- शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! फेब्रुवारीत चार हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार !
- आनंदाची बातमी ! आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार दीड लाख रुपयांची थकबाकी !
- इन्फोसिसच्या शेअर्सची रॉकेट तेजी ! नफा कमी झाला तरी गुंतवणूकदारांची जोरदार खरेदी, ‘हे’ आहे कारण













