सासरच्या लोकांनी माहेरच्या लोकांना मारले

Ahmednagarlive24
Published:

कोपरगाव ;- तालुक्यातील पोहेगाव परिसरात राहणारे बाबासाहेब चंदर भोजणे, वय ४२, धंदा शेती यांना त्यांची मुलगी उषा संतोष वायकर, रा. इंदिरानगर, ता. कोपरगाव तिच्या सासरच्या लोकांनी जमाव जमवून घरात घुसून बेदम मारहाण केली.

या मारहाणीत बाबासाहेब भोजणे यांची आई, मुलगी उषा संपत वायकर, भाऊ सुखदेव चंदन भोजणे, कांताबाई सुखदेव भोजणे, सर्व रा. पोहेगाव हे जखमी झाले.

जखमी बाबासाहेब चंदर भोजणे यांच्या फिर्यादीवरुन मारहाण करणारे आरोपी मल्हारी भाऊराव भोजणे, सोमनाथ भाऊराव भोजणे, दगडू भाऊराव भोजणे, गोरख श्रावण भोजणे, कांताबाई सुखदेव भोजणे, सर्व रा. सोनेवाडी, ता. कोपरगाव

यांच्याविरुद्ध शिर्डी पोलिसांत भादवि कलम ३२४, ३२३, ४५२, ५०४, ५०६, १४३, १४७, १४८ गुरनं. ६७९ दाखल करण्यात आला असुन वरील आरोपींनी मागील भांडणाच्या कारणावरुन लोखंडी गज, काठीने मारहाण केल्याचे फिर्याद म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment