अहमदनगर :- शहर सहकारी बँकेचे आयडीबीआय बँकेमधील अकाउंट वरून सुमारे 45 लाख रुपये परस्पर दुसऱ्या बँकेच्या अकाउंटवर वर्ग करण्यात आले.
रविवारी हा प्रकार घडल्यानंतर शहर बँकेच्या अधिकार्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
शहर सहकारी बँकेचे आयडीबीआय बँकेत शाखेमध्ये चालू खाते आहे. रविवारी बँकाना सुट्टी होती. सुट्टीच्या दिवशी शहर बँकेच्या खात्यातून 45 लाख रुपये वर्ग झाल्याचे SMS बँकेच्या अधिकार्यांना आले.
हे पैसे 27 वेगवेगळ्या बँक खात्यावर वर्ग झाले. शहर बँकेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ आयडीबीआय बँक ही कल्पना दिली.
आयडीबीआय बँकेच्या अधिकाऱ्यांनी पैसे वर्ग झालेली काही बँका ती तात्काळ गोठवली.
त्यामुळे शहर बँकेच्या मोठ्या रकमेची फसवणूक बँकेने अधिक माहिती घेतल्यानंतर वर्ग झालेल्या काही बँक खात्यामधून मात्र सहा लाख रुपये आणखी वेगळ्या बँक खात्यामध्ये गेलेले आहेत.
या पैशाबाबत पोलीस तपास करत आहेत. मंगळवारी शहर बँकेच्या अधिकाऱ्यांनी एसपी कार्यालयातील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. बँक अकाउंट हॅक करून पैसे दुसऱ्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आले आहे.
आतापर्यंत एकूण चाळीस लाख रुपये वर्ग केलेले खात्यावरील व्यवहार बँकेशी संपर्क करून थांबविण्यात आले आहे.
- ‘या’ 4 राशींवर असते भगवान श्रीकृष्णाची अपार कृपा, जीवनात होतो धन-सुखाचा वर्षाव!
- ‘या’ जन्मतारखेच्या स्त्रियांनी घरात पाऊल टाकताच खुलते नशीब, पतीसाठी साक्षात लक्ष्मीचं रूपच ठरतात!
- खोडकर मन, हट्टी स्वभाव, गुप्त योजना आणि कोटींची खेळी…’या’ मूलांकचा जन्मच होतो श्रीमंतीसाठी!
- महाराष्ट्रातील ह्या 96 गावांमध्ये विकसित होणार चौथी मुंबई ! कसा आहे शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प?
- तुमचं खासगी जीवन येऊ शकतं धोक्यात, हॉटेल आणि चेंजिंग रूममध्ये ‘अशा’ पद्धतीने शोधा लपलेले कॅमेरे!