अहमदनगर :- गेल्या काही दिवसांपासून नगर शहरातील शाळा, क्लासेसच्या पार्किंगमधून रेसर सायकली चोरीला गेल्याचे गुन्हे नोंदविण्यात आले होते. माळीवाडा येथील फिरोदिया हायस्कूलच्या पार्किंगमधून एक रेसर सायकल चोरताना दोघांना कोतवाली पोलिसांनी पकडले.
दोघांकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर पब्जी गेम खेळण्याकरिता मोबाइल खरेदी करण्यासाठी दोघांनी सायकली चोरून विकल्याचे उघडकीस आले आहे. पकडलेली दोन्ही मुले नगर तालुक्यापासून जवळ असलेल्या गावामध्ये राहतात.
नुकतीच ती दहावी उत्तीर्ण झाली असून, एका महाविद्यालयात अकरावीचे शिक्षण घेतात. दोघांना पब्जी गेम खेळण्यासाठी चांगला मोबाइल खरेदी करायचा होता. दोघांनी घरच्यांकडे मोबाइल खरेदी करण्यासाठी पैसे मागितले. परंतु, शिक्षण सुरू असल्याने घरच्यांनी मोबाइल देण्यास नकार दिला.
त्यामुळे दोघांनी मोबाइल घेण्यासाठी शहरातून रेसर सायकली चोरायचे ठरवले. यातील एकाकडे मोटारसायकल होती. या मोटारसायकलवरून ते दोघे शिक्षणासाठी गावाकडून येत होते. याच मोटारसायकलवरून त्यांनी रेसर सायकल चोरायचे ठरविले.
सावेडी उपनगरातील एका क्लाससमोरून त्यांनी एक रेसर सायकल चोरली. ही चोरी पचल्यानंतर आणखी काही सायकली शहरातून चोरल्यानंतर या सायकली गावामध्ये दोन ते तीन हजार रुपयांना विकल्या होत्य़ा. त्यातून वीस हजार रुपयांचा मोबाइल नगरमध्ये खरेदी केला होता.
या मोबाइलमध्ये पब्जी गेम घेऊन दोघेही गेम खेळत होते. सायकली चोरून एक मोबाइल खरेदी केल्यानंतर आणखी एक मोबाइल खरेदी करण्यासाठी ते सायकल चोरी करत असताना पकडले गेले.
- Penny Stocks 2025 : 1 रुपयांच्या शेअरमध्ये तुफान तेजी, गुंतवणूकदारांची मोठी कमाई …
- Oneplus Open Offer : वनप्लसचा फोल्डेबल मोबाईल झाला स्वस्त ! तब्बल चाळीस हजार…
- जिओ फायनान्शिअलच्या शेअरबद्दल महत्वाची अपडेट ! शेअर लवकरच ₹300 च्या वर…
- iPhone वापरणाऱ्यांसाठी खास माहिती ! वाचा ‘i’चा अर्थ काय होतो ?
- राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! PM Kisan Yojana नियमांमध्ये बदल होणार