पंचवीस वर्षीय तरुणाची रेल्वे खाली आत्महत्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- नगर – कल्याण रोडवरील उड्डाणपुलाखाली सागर छबूराव साळवे (रा.बुऱ्हाणनगर) या तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या केली.

गोवा एक्‍सप्रेस रेल्वेखाली सापडून साळवेचा मृत्यू झाला. सागर याने आत्महत्या का केली याचा अद्याप उलगडा झाला नाही.

सागर याचे दीड वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्याला एक दोन महिन्यांचा मुलगा आहे. त्याच्या पश्‍चात आई, वडील, 1 भाऊ पत्नी असा परिवार आहे.

या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस ठाण्याचे हे. कॉ. देशमुख तातडीने घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाचा पंचनामा करुन रेल्वे पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment