विठ्ठलाच्या नगरीत सामूहिक बलात्कार

Published on -

पंढरपूर : अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावर पाच जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पंढरपूरमध्ये उघड झाली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौघांना अटक करण्यात आल्याचे समजते.

आरोपींपकी एकाने बलात्काराच्या घटनेचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी पीडितेला दिल्याचे समोर आले आहे. 

सूत्रांच्या माहितीनसार, पीडिता ही आरोपींपैकी एकाची मैत्रीण होती. आरोपीने या मुलीला एका अनोळखी ठिकाणी बोलावले. तिथे त्याचे चौघे मित्र आधीच आले होते. या पाच जणांनी तिला दारु पाजली आणि त्यानंतर बलात्कार केला.

यातील एकाने  या सर्व घटनेचे चित्रण केले आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने या घटनेची कुठेही वाच्यता केली नाही. याचाच गैरफायदा घेऊन या नराधमांनी तिच्यावर अनेकदा बलात्कार केला

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe