पारनेर – ढवळपुरी येथे असणाऱ्या तलावात तीन सख्या भावाचा बुडून मृत्यू झाला. गुरुवारी (दि.६) रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
इस्माईल बालम शेख ( वय- २०) नावेद नुरंम्हमद शेख (वय -१६) मोईन निजाम शेख (वय १४) अशी मृत्यू झालेल्या तीन भावंडांची नावे आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, उन्हाळ्याची सुट्टी असलेल्यामुळे ढवळपुरी येथील बिरोबा मंदिर लगत असलेले एका शेतात पिकाला पाणी देण्यासाठी कृत्रिम शेततळे उभारले होते.
हे तीनही भाऊ आज पोहण्यसाठी गेले होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला बराच वेळ झाला तरी मुले घरी न आल्यामुळे या भावडांचा घरातील लोकांनी शोध घेतला
काही वेळानंतर मुले शेततलावात पोहत होते. अशी माहिती मिळताच घरातील व गावातील ग्रामस्थांनी शेततलाव जाण्यासाठी धाव घेतली
परंतु एकमेकांना वाचविण्यासाठी धडपड करणा-या तीनही भावांचा मृत अवस्थेत दिसले. या दुर्दैवी घटने बद्दल ढवळपुरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
- Middle Class लोकांसाठी Vi ने लॉन्च केले जबरदस्त प्लॅन्स ! मिळणार अनलिमिटेड कॉलिंग, डेटा
- PM Kisan योजनेबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर; ‘या’ लोकांना येणार नाही जूनचा हप्ता
- पेन्शन धारकांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ पेन्शनधारकांची जूनची पेन्शन येणार नाही
- पाच पिढ्यांची पाण्याची प्रतीक्षा संपली! अखेर निळवंडेचे पाणी पोहोचले दहेगावात, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू
- तृतीयपंथी चालविणारे राज्यातील पहिलं शेळीपालन केंद्र चितळी येथे साकार ! तृतीयपंथीयांच्या रोजगारासाठी नवी वाट