पुणे : तरुणीकडून वेश्याव्यवसाय करून घेत त्यातून येणाऱ्या उत्पन्नावर उपजीविका भागविल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एकाला अटक केली. न्यायालयाने त्याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
मयूर दुर्योधन लोंढे (वय २१, रा. बरड, जि. सातारा) असे कोठडी दिलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी २३ वर्षीय महिलेची सुटका केली आहे. याबाबत गुन्हे शाखेचे आण्णा दिलीप माने यांनी फिर्याद दिली आहे. ७ सप्टेंबर रोजी पुणे स्टेशन परिसरात ही घटना घडली.
आरोपी लोंढे हा पीडित तरुणीला पैशाचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत होता. याप्रकरणी लोंढे याला न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्याच्या तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील अनंत चौधरी यांनी केली. ती न्यायालयाने मान्य केली.