मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकाला १० वर्षाचा तुरुंगवास

Published on -

सातारा : अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केल्याप्रकरणी दीपक महादेव जांभळे (४९, रा. महाबळेश्वर) याला न्यायालयाने १० वर्षे कारावास व ५० हजार रुपये दंड, दंड न दिल्यास ३ महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली.

दरम्यान, पीडित मुलगी ही नेपाळची असून निराधार असल्याने आरोपीच्या शेतामध्ये कामाला होती. दीपक जांभळे हा स्ट्रॉबेरीची शेती करतो. जून २०१४ मध्ये त्याच्याकडे पीडित मुलगी शेतमजूर म्हणून काम करत होती. ती निराधार असल्यामुळे त्याच्याकडेच राहत होती.

दीपक याने मुलीला विश्वासात घेऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यात ती गर्भवती राहिली. या घटनेनंतर संबंधित मुलीने पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार आरोपीविरोधात गुुन्हा दाखल करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe